Saturday 10 October 2020

Ushakaal autobiography by Ushadevi Vijaykumar Jadhav

 उष:काल 

(आत्मचरित्र)

लेखिका : श्रीमती उषादेवी विजयकुमार जाधव


ISBN No.: 978-81-937448-6-4

प्रथम आवृत्ती : ऑक्टोबर, 2020. संयोग प्रकाशन, नाशिक

प्रकाशकिय

प्रबळ जीवननिष्ठा, कार्यनिष्ठा व समोर आलेल्या परिस्थितीशी चार हात करून पुढे जाण्याची जीद्द असली की माणूस कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढून यशस्वी होतो, हेच चित्रण लेखिकेने या आत्मचरित्रातून मांडलेले आहे. 

ग्रामीण भागातील एक मुलगी घरातील लोकांचा तितकासा पाठिंबा नसुनही उच्च शिक्षण घेते, लग्न करून, फक्त सुखी संसाराचे छोटेसेच स्वप्न घेवून मुंबईसारख्या स्वप्ननगरी म्हटल्या जाणाऱ्या शहरात येते. मात्र हे छोटेसे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देखील तिला खूप मोठा संघर्ष करावा लागतो.  लग्नानंतर झालेल्या भ्रमनिरासातून बाहेर निघून, आयुष्यात पावला-पावलावर आलेल्या क्लेशकारक, वेदनामय प्रसंगांशी लढते. मोठ्या हिंमतीने, जिद्दीने व आत्मविश्वासाने आपल्या आयुष्याचे अस्तित्त्व उभे करते. सुखी-समृध्द संसाराचे स्वप्न पूर्ण करते. मातीमोल ठरू पाहणाऱ्या आपल्या जीवनाला एका सन्माननीय उंचीवर नेऊन ठेवते. महत्त्वाचे म्हणजे, केवळ स्वत:च्याच परिश्रमाने यशस्वी होऊनही त्याचा किंचितही अभिमान किंवा स्वार्थभाव न जपता नात्यांची वीण ती सैल होऊ देत नाही, नात्यांना जपते, नात्यांसाठी झटते व नात्यांची वीण अधिकच घट्ट करत नेते. आयुष्याच्या कक्षा विस्तारल्या तरी जमिनीवर पाय टिकवून ठेवण्याची वृत्ती शाबूत ठेवते! अशा स्त्रीची ही कथा अद्‌भूत, प्रशंसनीय अशीच आहे. पण त्याही पुढे जाऊन, जीवनातील लहान-मोठ्या अपयशाच्या, दु:खाच्या, प्रतिकूल प्रसंगांपुढे माघार घेऊन नैराश्याच्या खोल गर्तेत भरकटून जाणाऱ्या व नशिबाच्या नावाने हात टेकणाऱ्या असंख्य लोकांना लढवय्या वृत्तीचा संस्कार व शिकवण देणारी, त्यांच्या जीवनात जीवननिष्ठेचे बीजारोपण करून यशाची उंच झेप घेण्याचे मनोबल व प्रेरणा देणारी, अशी ही लेखिकेची आत्मकथा खरोखर यशोगाथा आहे.

श्रीमती उषादेवी जाधव यांच्या खडतर जीवन संघर्षास, लढवय्या वृत्तीस आणि प्रबळ, सकारात्मक जीवननिष्ठेस आदरपूर्वक सलाम! त्यांच्या आत्मचरित्रात्मक उष:काल: या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त त्यांना मनपूर्वक शुभेच्छा!

- डॉ. योगेश दे. वानखेडे, संचालक : संयोग प्रकाशन, नाशिक

उष:काल - पुस्तकमूल्य : रु. 240/-

प्रस्तावना : श्री. विश्वास विजयकुमार जाधव

शुभेच्छा : मीरा, 

पाठराखण : सौ. मृणाल संतोष इंदप


पुस्तकात व्यक्त झालेल्या लेखिकेच्या निवडक विचारधारा





याच प्रकारच्या लेखिकेच्या विचारधारा, जीवनविषयक चिंतन व तिचा खडतर जीवनसंघर्ष समजून घेण्यासाठी लेखिकेचे  'उष:काल ' हे आत्मचरित्र अवश्य वाचा. हे  पुस्तक  वाचकांना संघर्षात्मक परिस्थितीत सकारात्मक जीवन जगण्याचा  प्रेरणादायी संस्कार  व शिकवण  प्राप्त करून देईल असा विश्वास वाटतो.

श्रीमती उषादेवी विजयकुमार जाधव यांच्या आयुष्यातील निवडक स्मरणचित्रे









पुस्तक प्राप्त करण्यासाठी तसेच आपल्या प्रतिसादासाठी संपर्क :
9987509875 / 8999865641
E.mail : ushaj1952@gmail.com