वैभव हे सृजनाचे
(साहित्यकलाकृतींची आस्वादक समिक्षा, मूल्यमापन व परिचय)
मूल्य : रु. 250/-
प्रकाशक : संयोग पब्लिकेशन, नाशिक.
ISBN 978-81-949467-1-7
आशयाने भरलेली जीवनदृष्टी साहित्यिक आपल्या साहित्यकृतीतून अभिव्यक्त करीत असतो. अशा साहित्यकृतीतून वाचक निर्भेळ आनंद मिळवितो. या साहित्यकृतीत माणसाला गुंगवून ठेवण्याचे सामर्थ्य असते. काही पुस्तके आणि त्यातील माणसे जीवनाला उभारी देण्याचे, आत्मविश्वास वाढविण्याचे काम करतात. काही पुस्तके जीवनाचे रहस्य, अर्थ शोधण्याचे काम करून त्यातून तत्त्वचिंतन करतात. तर काही पुस्तके विविध कलाकृतींचा आशय उलगडून तिच्यातील सौंदर्य उलगडून दाखविण्याचे काम तटस्थतेने करतात.
या पुस्तकात कविता, बालकादंबरी, महाकाव्य, भावकविता, बालकविता, त्यातील विश्वमानवता, कुतूहलपूर्ती, विविध वाड्मय कृतींची समीक्षा, त्या समीक्षेची समीक्षा, व्यक्तिचित्रण आणि शिक्षण इत्यादी विषयांवरील कलाकृतीचे अंतरंग आस्वादक पातळीवर अविष्कृत करण्याचा प्रयत्न केला आहे.
या पुस्तकातील काही लेखात काव्य कलाकृतींचा आस्वाद आणि मूल्यमापन केले आहे. तर काही लेखांमध्ये साहित्यिकांचा गौरव, आस्वादक समीक्षा ग्रंथांचा परिचय, आत्मप्रत्ययातून व्यक्त झालेले भावपदर, काही विनोदी ग्रंथांचा परिचय, आत्मचरित्रातून व्यक्तीचा जिद्दी स्वभाव आणि बाल कादंबरीतून व्यक्त झालेले बालकाचे धाडसीपण इत्यादी घटकांचा परिचय करून दिला आहे.
बालसाहित्यातून बालकांची कुतूहलपूर्ती आणि विज्ञान यांचा संबंध आणि त्यांच्या भावनिक आणि बौद्धिक विकासासाठी पूरक ठरणारे 2020 चे शैक्षणिक धोरण यांचाही ऊहापोह केला आहे. गान तपस्विनी स्व. लता मंगेशकर यांचे व्यक्तीचित्रण येथे आले आहे.
प्रेम ही जीवनस्पर्शी भावना असून ते चिरंतन मूल्य आहे. त्याबाबत काही प्रातिनिधिक उदाहरनातून प्रेमभावनेचे विविधांगी विवेचन केले आहे.
आज समाजजीवनात होणारी मूल्यांची घसरण, पसरत जाणारा समाजातील भयग्रस्त काळोख, शेती आणि शेतकरी यांच्या दुःखाची परवड, त्याचे शोषण आणि दाहकता, त्यांची लुबाडणूक इत्यादी घटकांचे चित्रण ज्या काही कविता संग्रहातून नवकवींनी व्यक्त केले आहे, त्याचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न येथे आहे.
पुस्तक खरेदीसाठी संपर्क करा :
मो. 9423181087 / 8830638488 / 9881168509
लेखक प्राचार्य डॉ. पंडितराव पवार यांचा चित्र-परिचय :
कवी
अनिल (आ.रा. देशपांडे) यांचे समवेत (1977) सिन्नर
कविवर्य
कुसुमाग्रज यांचे समवेत डॉ. गोपाळ मिरीकर, डॉ. गंगाधर मोरजे, डॉ. अनिल
सहस्त्रबुध्दे (डॉ. मोरजे षष्ट्यब्धीपूर्ती समारंभ-1992), अहमदनगर
निफाड महाविद्यालयाच्या
पदवी परीक्षेचा उत्कृष्ट निकाल लागल्याबद्दल पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राम
ताकवले यांचे हस्ते सत्कार (1987)
पुणे
विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर निवड झाल्याबद्दल मराठा विद्याप्रसारक
संस्थेतर्फे तत्कालिन सरचिटणीस डॉ. वसंतराव पवार यांचे हस्ते सत्कार. समवेत
दादासाहेब पोतनीस, संपादक दै. गांवकर, नाशिक. सोबत कृष्णा भगत, ॲड. जी.एन. शिंदे व
इतर (1989)
ज्येष्ठ
शास्त्रज्ञ आणि पुणे विद्यापीठाचे तत्कालिन कुलगुरू डॉ. वसंतराव गोवारीकर यांचेशी
म.वि.प्र. च्या सटाणा महाविद्यालयाच्या कमकाजाबाबत चर्चा करतांना. समवेत सौ.
शकुंतला भामरे, उपकुलगुरू डॉ. बी.डी. चौरे, प्रा. बी.टी. कोल्हे, प्रा. शिंदे इतर
मान्यवर.
माननिय
खासदार आणि म.वि.प्र. संस्थेचे सभापती श्री. प्रतापराव नारायणराव सोनवणे यांचे
पिंपळगांव (ब.) महाविद्यालयात स्वागत करतांना.
म.वि.प्र.
च्या सटाणा महाविद्यालय रौप्यमहोत्सव सांगता समारंभ प्रसंगी पुणे विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ. श्रीधर गुप्ते यांचे हस्ते सत्कार स्विकारतांना. समवेत डॉ. वसंतराव
पवार, प्रा. ए.डी. अहिरे व इतर.म.वि.प्र.
च्या नांदगांव महाविद्यालयात काकासाहेब वाघ व माधवराव बोरस्ते पुण्यस्मरण
कार्यक्रमात भाषण करतांना. समवेत श्री. मनसुख पाटील, श्री. मवाळ.
श्री.
दुलाजीनाना पाटील ‘शतायुषी’ गौरवग्रंथाचे प्रकाशन प्रसंगी ना. शरदचंद्र पवार, ॲड.
रावसाहेब शिंदे, श्री. विनायकराव पाटील, ॲड. नितीन ठाकरे, सौ. पगार
(जि.प.अध्यक्षा) यांचे समवेत. (पिंपळगांव बसवंत)
श्री.
दुलाजीनाना पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा आदिवासी सेवक आणि पुणे विद्यापीठाचा
जीवनसाधना गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करतांना. (पिंपळगांव बसवंत कॉलेज)
म.वि.प्र.
संस्थेचा वाघ गुरूजी आदर्श शिक्षक पुरस्कार आमदार करनसिंह पवार (धार) यांचे हस्ते
समाजदिनी (2004) स्विकारतांना. समवेत सरचिटणीस डॉ. वसंतराव पवार, उपसभापती ॲड.
नितीन ठाकरे.पुणे
विद्यापीठाचा आदर्श प्राचार्य पुरस्कार (पिंपळगांव ब. कॉलेज) विद्यापीठाचे कुलगुरू
डॉ. नरेंद्र जाधव यांचे हस्ते विद्यापीठ वर्धापन दिनी स्विकारतांना. समवेत
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. देशमुख. (10 फेब्रुवारी, 2007)
पुणे
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रघुनाथ शेवगावकर यांचे विभागीय उपकेंद्र नाशिकच्या वतीने
स्वागत करतांना डॉ. वसंतराव पवार यांचे समवेत. सोबत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.
माणिकराव जाधव, डॉ. मोरे व्ही.एस.
पुणे
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांचेसोबत नाशिक विभागीय उपकेंद्राच्या
विकासाबाबत समन्वयक या नात्याने चर्चा करतांना. सोबत प्राचार्य डॉ. बी.जी. वाघ,
डॉ. व्ही.बी. गायकवाड, श्री. विश्वासराव मोरे (पिंपळगांव ब. कॉलेज), उपप्राचार्य
श्री. शेळके.
कविवर्य
मंगेश पाडगांवकर यांचे समवेत. निफाड महाविद्यालय (1985)
पिंपळगांव
बसवंत महाविद्यालयात सुवर्णमहोत्सवी वर्षात (1968-2017) माजी प्राचार्य डॉ. पवार
यांचा सत्कार करतांना सा. फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर. सोबत
म.वि.प्र. संस्थेचे पदाधिकारी श्री. माणिकराव बोरस्ते, श्रीमती निलिमाताई पवार,
श्री. राघोनाना आहिरे, डॉ. तुषार शेवाळे व इतर मान्यवर. (29 सप्टेंबर, 2017)
ज्येष्ठ
साहित्यिक स्नेही आणि मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे कुलगुरू डॉ. नागनाथ कोतापल्ले
यांचेशी चर्चा करतांना.
कवितेची
आस्वादरूपे, मराठी साहित्याची क्षितिजे आणि दीपस्तंभ या पुस्तकांचे ज्येष्ठ
पत्रकार कुमार केतकर यांचे हस्ते प्रकाशन. समवेत डावीकडून वसंतराव खैरनार, डॉ.
दिलीप धोंडगे, ज्योतिराव खैरणार व इतर.
‘साहित्य
आणि जीवन’ पुस्तकाचे प्रकाशन करतांना डॉ. यशवंत पाठक, श्री. दुलाजी सीताराम पाटील
व इतर.
‘साहित्य
आणि शिक्षण संदर्भ शोध’ पुस्तकाचे प्रकाशन करतांना सौ. प्रतिभा रानडे, श्रीमती
निलिमा पवार, वंदना अत्रे, श्री. वसंतराव खैरनार.
‘मराठी
कविता आकलन आणि आस्वाद’ पुस्तकाचे प्रकाश्न करतांना श्री. सुरेदश द्वादशीवार,
श्री. मोहन पिंगळे, डॉ. दिलीप धोंडगे इ.
‘शतायुषी’
श्री. दुलाजीनाना पाटील गौरवग्रंथ प्रकाशन करतांना मा.श्री. शरद पवार, ॲङ
आण्णासाहेब शिंदे, श्री. विनायकदादा पाटील, डॉ. वसंतराव पवार, ॲड. नितीन ठाकरे,
श्री. अरविंद कारे इ.
पुणे
विद्यापीठ उपकेंद्र, नाशिक येथे कार्यक्रम प्रसंगी प्रास्ताविक करतांना. सोबत डॉ.
व्ही. बी. गायकवाड, डॉ. वसंतराव पवार, कुलगुरू श्री. शेवगावकर, कुलसचिव डॉ. जाधव.
सटाणा
महाविद्यालयात चर्चासत्राप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्वागत करतांना डॉ. दिलीप
धोंडगे (प्राचार्य), डॉ. आर. के. देवरे (अधिष्ठाता, पुणे विद्यापीठ)
कुमार
केतकर, डॉ. दिलीप धोंडगे, श्री. वसंत खैरनार यांच्याशी दिलखुलास गप्पा.
‘साहित्यातील
पांडित्य’ पुस्तक प्रकाशन. श्री. प्रकाश कोल्हे, डॉ. यशवंत पाटील, सौ. पवार, कु.
सावली, श्री. प्रवीण जोंधळे.
सार्वजनिक
वाचनालय नाशिकचा आदर्श शिक्षक पुरस्कार पुणे विद्यापीठाचे माजी उपकुलगुरू डॉ.
नवलगुंदकर यांचे हस्ते स्विकारतांना. समवेत वाचनालयाचे पदाधिकारी.
काकासाहेब
वाघ महाविद्यालयातून सेवानिवृत्त होतांना संस्थेच्या वतीने डॉ. वसंतराव पवार, ॲड.
नितीन ठाकरे, श्री. अरविंद कारे, श्री. मालोजीराव मोगल, माणिकराव बोरस्ते, डॉ.
विश्राम निकम, श्री. भास्करराव बनकर, श्री. दिलीप मोरे, श्री. प्रतापराव मोरे,
आदिंच्या उपस्थितीत सपत्निक सत्कार. (1 फेब्रुवारी, 2007, पिंपळगांव बसवंत
महाविद्यालय.)‘काव्यातील
पांडित्य’ या पुस्तकाचे प्रकाशन करतांना. शेजारी सरस्वती पवार.
संयोग पब्लिकेशन : अल्प परिचय
संयोग
पब्लिकेशन ही व्यावसायिक संस्था 1999 पासून कार्यरत आहे. या संस्थेमार्फत
शैक्षणिक, माहितीपर, ललित लेखन, आध्यात्मिक पुस्तकांच्या कल्पक व किफायतशीर निर्मितीची,
प्रकाशनाची, प्रसिध्दीची, संपादन संस्करणाची व परीक्षणाची सेवा दिली जाते.
याचप्रमाणे पुस्तक प्रकाशनातील शासकिय व्यवहाराच्या ज्या बाबी असतात त्याबद्दलचीही
मार्गदर्शन सेवा (Consultancy) दिली जाते. संस्थेकडे शासकिय नियमाप्रमाणे ISBN (International Standard Book Numbering) रजिस्ट्रेशन व्यवस्था उपलब्ध आहे. आजपर्यंत अनेक
मान्यवरांना तसेच इतरही प्रकाशन संस्थांना संयोग प्रकाशनने आपली सेवा प्रदान
केलेली आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे पुढील काळात ‘ई-बुक’
फॉरमॅटमधील पुस्तकांची मागणी वाढत जाणार आहे. ही गरज ओळखून संयोग पब्लिकेशनने ‘ई-बुक’
निर्मिती व वितरण सेवाही आता उपलब्ध करून दिलेली आहे. गुगल बुक्स, ॲमेझॉन या
संकेतस्थळांवर देखील पुस्तक वितरणाकरिता नोंदणी करण्यात आलेली आहे. Ebook Shop ही नाविन्यपूर्ण ऑनलाईन पुस्तक प्रकाशन व वितरण सेवा
संयोग प्रकाशनाकडून सुरू करण्यात आलेली आहे.
संयोग
प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या तसेच इतर काही प्रकाशकांच्या पुस्तक निर्मितीत
योगदान दिलेल्या काही निवडक पुस्तकांचे मुखपृष्ठ पुढील लिंकद्वारे आपणास बघता येऊ
शकतात.
https://sanyogpublicationnashik.blogspot.com/
https://sanyogpublicationnashik.blogspot.com/2015/09/blog-post_93.html
संपर्क : डॉ. योगेश वानखेडे
संयोग पब्लिकेशन, नाशिक
–
9881168509 / 8830638488