एक दिवसीय सहल,
लेखक : लक्ष्मण नारायण मांडे,
संयोग पब्लिकेशन, नाशिक
नाशिक शहर व नाशिक जिल्हा हे पर्यटनाच्या दृष्टीने तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेले समृध्द व प्रसिध्द स्थळ आहे. नाशिक जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळं आहेत. अगदी एक दिवसात सहज फिरून येता येईल, निसर्ग सानिध्यात रमता येईल अशा एक दिवसीय सहलीच्या अनेक जागा आहेत. यातील अनेक जागा किंवा स्थळं पर्यटकांना माहिती नाहीत. अशा स्थळांची माहिती करून देता यावी व पर्यटकांना, गीर्यारोहकांना एक दिवसीय सहलीचा आनंद घेता यावा, या हेतूने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.
नाशिक शहर, जिल्हा व सभोवतालच्या प्रेक्षणिक स्थळांची क्षणचित्रे