Sunday, 24 November 2019

Enhancement of Study Skills Among Students book written by Dr Saroj V Upasani and review by Dr Yogesh Wankhede




 #Enhancement of Study Skills Among Students
by Dr Saroj V. Upasani


ISBN : 978-81-937448-1-9
      अभ्यास करणे हे ज्ञानतृप्तीचे साधन आहे! अभ्यासामुळे, ज्ञानसंपादनामुळे जसे आत्मिक समाधान लाभते, तसेच आसपासच्या व्यावहारिक जगात सक्षमतेने जगण्यासाठी व्यक्तीची अभ्यासवृत्ती व त्याद्वारे मिळविलेले चौफेर ज्ञान लाभदायी ठरते. सुशिक्षित होणे ही नाण्याची एक बाजू असली तर अभ्यास ही दुसरी बाजू म्हणता येईल. अभ्यासूवृत्ती ही प्रत्येकच व्यक्तीला आयुष्यभर उपयुक्त असली तरी विशेषत: विद्यार्थीदशेत ही अभ्यासूवृत्ती विद्यार्थ्याला त्याचे शैक्षणिक ध्येय प्राप्त करण्यास अधिकच उपयोगी ठरते.
      विद्यार्थ्याने आपले शैक्षणिक ध्येय साध्य करण्यासाठी केवळ अभ्यास करणे पुरेसे नसून, तो अभ्यास अधिक नीटनेटका, आकलनपूर्ण होणे गरजेचे असते. त्याकरिताच विद्यार्थ्याला अभ्यास कौशल्यांची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांना शाळांमध्ये व त्यापुढीलही शैक्षणिक जीवनात विशिष्ट अभ्यासक्रम शिकविला जातो, मात्र तो अभ्यास कौशल्यपूर्णतेने कसा करावा? हे मात्र बहुदा शिकविले जात नाही. विद्यार्थ्यांची हीच गरज ओळखून शिक्षणक्षेत्रात प्रदीर्घ योगदान‍ दिलेल्या डॉ. सरोज उपासनी यांनी Enhancement of Study Skills Among Students या पुस्तकाचे लेखन केले आहे. हे पुस्तक केवळ विद्यार्थ्यांनाच उपयुक्त नसून शिक्षणप्रक्रियेचे चारही स्तंभ; म्हणजेच विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शैक्षणिक संस्था अशा सर्वांनाच महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास लेखिकेने व्यक्त केला आहे.
            या पुस्तकाचे प्रथम लोकार्पण महाराष्ट्रातील प्रसिध्द शिक्षणतज्ञ व नाशिकचे गौरवस्थान, शिक्षणप्रेमींचे प्रेरणास्थान, एक अभ्यासू व ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्व अर्थातच गोखले एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी सर डॉ. मो.स. गोसावी यांचे हस्ते 19 जुलै, 2018 रोजी करण्यात आले होते. या पुस्तकाला लाभलेला अभ्यासू वाचकांचा प्रतिसाद बघून नाशिक येथील ‘संयोग प्रकाशनाने’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित केले आहे.
      सदर पुस्तकात लेखिकेने विविध अध्ययन कौशल्यांचे सखोल मार्गदर्शन केलेले आहे. विद्यार्थी अध्ययन कसे करतो? परिणामकारक अध्ययनासाठी विद्यार्थ्यात कोणकोणत्या पात्रता असाव्या लागतात? अध्ययनाची अर्थात अभ्यासाची प्रक्रिया कशी असते? अभ्यास कौशल्यांचा विकास कसा साधावा? अभ्यासात नैपूण्य वाढविणारे घटक, मानसिकता व दृष्टिकोन तसेच इतर गुणवैशिष्ट्ये, शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत शैक्षणिक प्रक्रिया करतांना करावयाच्या व टाळावयाच्या बाबी, शिक्षकांचे अध्यापन सुरू असतांना विद्यार्थ्यांनी परिणामकारक नोंदी कशा घ्याव्यात? आकलनशक्ती कशी वाढविता येईल? अध्ययनसाहित्याचे वाचन करतांना नोंदी कशा ठेवाव्यात?, लिहिण्याची कला-कौशल्ये, अभ्यासातील एकाग्रता, निरीक्षणाची कला, ऐकण्याची कला, परीक्षेकरिता प्रभावी उजळणी कशी करावी? स्मृती सुधारणा तंत्रे, अशा विविध प्रश्नांची उत्तरे व संबंधित गोष्टींचे मार्गदर्शन या पुस्तकातून मिळते. यासोबतच आरोग्य व शिक्षण यांचा संबंध, कार्यशक्ती व वेळ यांचे व्यवस्थापन, अभ्यास व प्रेरणा, प्रस्तुतीकरण अर्थात शैक्षणिक सादरीकरणाची कला, संभाषण कला, गटचर्चा करण्याची कला, शिस्तपालनाचे महत्व, मानवी संबंध जपण्याची कला अशा विद्यार्थ्याला शैक्षणिक उपलब्धीच्या दिशेने नेणाऱ्या विविध गोष्टींची अभ्यासपूर्ण चर्चा देखील या पुस्तकात करण्यात आलेली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने व प्रत्येक शैक्षणिक संस्थेने आपल्या संग्रही ठेवावे, असेच हे पुस्तक आहे.
      पुस्तकाच्या लेखिकेबद्दल थोडक्यात सांगायचे झाल्यास, डॉ. सरोज उपासनी यांनी तब्बल 50 वर्षे शैक्षणिक क्षेत्रास आपले बहुमूल्य योगदान दिलेले आहे. डॉ. उपासनी यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण करुन नर्सिंग ह्या व्यवसायात पदार्पण केले. सुरूवातीला नर्सिंग डिप्लोमा, पुढे पोस्ट बेसीक बी.एस्सी. नर्सिंग डिग्री मुंबई विद्यापिठातून प्राप्त केली. मास्टर्स इन नर्सिंग (1986-88), आणि पीएच.डी (2005) ‘सार्वजनिक आरोग्य परिचर्या’ या विषयात एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई येथून प्राप्त केली. याव्यतिरिक्त समाजशास्त्र या विषयात 1975 मध्ये बी.ए. ही पदवी प्राप्त केली. त्यांनी परिचर्या शिक्षण संस्था मुंबई, जे.जे. हॉस्पिटल येथे 1978 ते 2007 पर्यंत ट्युटर, अध्यापिका, प्राध्यापिका अशा विविध पदांवरुन विद्यादानाचे कार्य केले. याचसोबत इंदिरा गांधी मुक्त विद्यापिठातील बी.एस्सी. नर्सिंग डिग्रीसाठी निरंतर अभ्यासक्रमाचे समन्वयक म्हणूनही योगदान दिले. 2007 मध्ये शासकीय पदावरील निवृत्तीनंतर कोकीळाबेन हॉस्पीटलमध्ये नवीन नर्सिंग कॉलेज स्थापनेत व तेथील प्रशासनात 2008 ते 2015 पर्यंत प्राचार्या म्हणून योगदान दिले. त्यानंतर एक वर्ष प्रवरा मेडिकल ट्रस्ट च्या लोणी येथील नर्सिंग कॉलेजमध्ये प्राचार्या म्हणून काम पाहिले व 2016 पासून आजपावेतो नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नर्सिंग कॉलेजमध्ये त्या उपप्राचार्या म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील चार नामवंत विद्यापिठांसोबत त्या पीएच.डी. गाईड म्हणून संलग्न असून 5 विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाने पीएच.डी. प्राप्त केलेली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे अभ्यास मंडळ अध्यक्ष, अकॅडमिक कौन्सील सदस्य, संशोधन मंडळ सदस्य, संशोधन पत्रिका सदस्य ही पदे त्यांनी भूषविली आहेत. व्यावसायिक परिचारिकांच्या अनेक प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी तज्ञ प्रशिक्षक म्हणून योगदान दिलेले आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या नर्सिंग विषयाकरिता समन्वयक म्हणून देखील डॉ. उपासनी सध्या आपले योगदान देत आहेत. तसेच महाराष्ट्र मराठी साहित्य परिषदेच्या सदस्य या पदावर देखील त्या कार्यरत आहेत.
      अशा ज्ञानसंपन्न व कार्यनिष्ठ लेखिकेने आपल्या असंख्य विद्यार्थ्यांना व शिक्षक बांधवांना समर्पित केलेले हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक व शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यास उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.
      वाचकांच्या मागणीनुसार याच पुस्तकाची मराठी अनुवादित आवृत्ती ‘शैक्षणिक विकासाकरिता सर्वसमावेशक अभ्यास कौशल्ये’ या नावाने संयोग प्रकाशनाने प्रकाशित केलेली आहे.
      डॉ. सरोज उपासनी यांचेकडून असेच शैक्षणिक कार्य समाज उन्नतीच्या दिशेने घडत राहो व याकरिता त्यांना सुसंपन्न आरोग्य लाभो अशा सस्नेह सदिच्छा!
-          डॉ. योगेश वानखेडे
संचालक – संयोग पब्लिकेशन, नाशिक
संचालक – माईंडसर्च कौन्सेलिंग, नाशिक
संपर्क : 9881168509
#sanyog publication

Saturday, 5 November 2016

वर्तमान की समस्याओं से मुठभेड़ है ‘कुड़ेदान में बचपन’
नासिक (महाराष्ट्र) के एक विद्यालय में अध्यापक एवं युवा रचनाकार रवि शुक्ला की प्रथम पुस्तक हाथों में है। शर्मसार करने वाले विभिन्न विषयों पर संवेदनशील चिंतन प्रस्तुत करती 9 कहानियों के माध्यम से मात्र 27 वर्षीय लेखक ने साहित्य जगत में अपनी दमदार उपस्थिति दर्ज कराई है। पुस्तक प्रथम दृष्टया सुंदर रंगीन आवरण पृष्ठ, बढ़िया कागज और उस पर निर्दाेष छपाई के माध्यम से पाठक का ध्यान आकृष्ट करती है तो सभी कहानियां सरल, सहज, प्रवाहमान भाषा में अपना संदेश देने में सफल है।
सर्वप्रथम शीर्षक कहानी ‘कूड़ेदान में बचपन’ की चर्चा करें। इस कहानी के माध्यम से लेखक ने कूड़ा बीनने वाले बच्चों की दारुण स्थिति का  संस्मरणात्मक चित्रण किया है। अनेक स्थलों पर दार्शनिक पुट लिये यह कहानी शेष सभी कहानियों के मुकाबले आकार से प्रभाव तक बड़ी होने के नाते इस संग्रह की आत्मा कही जा सकती है। देश की अर्थव्यवस्था से सामाजिक व्यवस्था तक की खबर लेती यह कहानी  पढ़ते हुए पाठक स्वयं को उसका  पात्रों को अपने परिवेश में ही अनुभव करता है। यथा-
‘बस! बस! इस समाज के डर से।
सिर्फ उनपर दया करने का, उन्हें म्लेच्छ समझने का अधिकार मुझे इस समाज ने दिया था।
हा हा हा ... समाज... समाज!!
समाज! कौन सा समाज?
किस बात का समाज?
किस आधार का समाज? किस समाज की बात कर रहा हूं मैं। उस समाज की जिसे इन नौनिहालों की चिंता नहीं। उस समाज की जिन्हें भावी पीढ़ी के कचरे में खोने की फिक्र तक नहीं सताती।
वह समाज जिन्हें केवल अपनी राह दिखाई देती है। ऐसे समाज से मैं डर का रुका रहा।’
इसी प्रकार एक अन्य कहानी ‘मेरे बाबूजी’ भी संस्मरणात्मक कहानी हैं। निम्न-मध्यम परिवार की आर्थिक कठिनाईयों का चित्रण करते हुई यह कहानी जहां संस्कार हस्तातरण को दर्शाती है वहीं छोटी सी सफलता पर इठलाते युवक को  सचेत करती है। यथा-  ‘अखबार में नाम तो चोर-डकैतों के भी छपते हैं। जरू़री क्या है, खुद तय कर लो। वक्त रहते न सुधरे तो कोई पच्चीस पैसे भी भीख में न देगा। हमारी चिंता मत करो, हमें तुमसे कुछ न चाहिए पर अपनी चिंता जरूर करों।’ इस बार मार नहीं थी। मार तो शरीर सह भी जाता। वह दर्द के साथ उतर जाती है। पर ये बोल मेरे लिए बाबूजी की उस मार से भी बढ़कर थे।
‘‘थके पांव’ के माध्यम से मातृविहीन बच्ची को पालने, संभालने (सिंगल पेरेन्टिंग) की भावनात्मक कठिनाईयांे का चित्रण है। हालांकि कहानी मुन्नी की शादी और उसकी विदाई के बाद पिता सोहनलाल की मानसिक स्थिति को चित्रित करती है लेकिन उसके संदेश व्यापक है। यथा- ‘बेटियां जिनके रहे से घर में स्वगा्रनुभूति होती है। जिनकी हंसी- ठिठोली पिता की सांसे होती है। जिनके चेहरे की एक खुशी से पिता का दिल भर आता है। आज वहीं मुन्नी इस घर को, पिता को ससम्मान विदाई दे चुकी थी।’
‘बेधर्म आतंक’ साम्प्रदायिक एकता पर केन्द्रित है जिसके मात्र दो ही पात्र हैं मन्ना लाल और सल्तनत। मालिक हिंदू, नौकर मुसलमान। दोनो अपने- अपने धर्म का पालन करते हैं परंतू कहीं कोई कट्टरता या कटुता नहीं। देखे- ‘बस फर्क इबादत के सलीके का है। गुरु हाथ जोड़कर साधना करता है तो चेला हाथ खोलकर। क्या फर्क पड़ता है।’
‘कल्ली’ उस विकलांग के साहस की दास्तां है जिसके बोझ करार दिया गया था। इस कहानी के माध्यम से रचनाकार समाज को संदेश देने का प्रयास करता है कि असक्षमता शरीर से अधिक मन- मस्तिष्क में होती है।
शेष कहानियां जैसे ‘थोड़ा प्यार’ बालमन की भटकन तो ‘5 रु के फूल’ गरीबी के शिकार कलुआ, मुनिया के प्रेम- सद्भावना को प्रकट करती है। ‘दो रोटी’ अत्यन्त भावुक कहानी है जो सुथनी नामक नौकरानी  के मन के उतार-चढ़ाव चित्रण है जहां अंत में सच्चाई की जीत होती है और वह अंगुठी लौट देती है। वह पुरस्कार में धन नहीं हमेशा की तरह ‘दो रोटी’ ही लेना चाहती है।
‘तभी आऐंगे अच्छे दिन’ शिल्प और विधा की दृष्टि से कहानी नहीं है लेकिन इसमें उठाया गया नारी सुरक्षा का मुद्दा महत्वपूर्ण है।
कुल मिलाकर  एक नये रचनाकार  ने जिस तरह से कटु- कठोर यथार्थ का सामना करते एक भावुक लेकिन विवेकशील अभिव्यक्ति की है उससे भविष्य की आशाएं जगाती है। इसे पढ़ते हुए पाठक संवेदनाओं का ज्वार भाटा स्वयं के मन से आंखो के भीगने तक अनुभव करता है। दार्शनिक प्रवाह और रोचक संवाद लिए इन कहानियों में लेखक ने मुंशी प्रेमचन्द के पात्रों की ही तरह नाम -सुथनी, कलिया, मुनिया चयन किये है। भाषा भी कलिष्टता से मुक्त है। रचनाकार वाद-विवाद प्रतियोगिताओं का राष्ट्रीय स्तर पर विजेता रह चुका है। उसी अभ्यास के प्रभाव के कारण अनेक स्थानों पर भाषण तत्व की अधिकता को कहीं-कही अनुशासन और कसावट की आवश्यकता महसूस होती है। समय और अनुभव भविष्य के लेखन में बेहतरी लायेगा, इसी विश्वास के साथ युवा रचनाकार रवि शुक्ला को बधाई। शुभकामनाएं! 

रचनाकार सम्पर्क- रवि शुक्ला- 8446036580
संयोग प्रकाशन, नासिक, पृष्ठ-108,  मूल्य-180 रु
समीक्षक- डा. विनोद बब्बर (संपादक-- राष्ट्र किंकर)
संपर्क-   09868211911 rashtrakinkar@gmail.com
 निवास --ए-2/9ए, हस्तसाल  रोड,
 उत्तम नगर नई दिल्ली-110059

Wednesday, 20 July 2016

Educational Statistics by Dr. M. A. Bhadane

Educational Statistics by Dr. M. A. Bhadane
ISBN 978-81-928288-4-8
Sanyog Publication, Nashik
Price : Rs. 250/- only.
शैक्षणिक संख्याशास्त्र हे डॉ. एम. ए. भदाणे यांनी लिहिलेले पुस्तक संयोग प्रकाशन, नाशिक यांनी प्रकाशित केलेले आहे. हे पुस्तक B.Ed., M.Ed., M.A. Education, M.Phil., Ph.D., DSM या अभ्यासक्रमांकरिता उपयुक्त आहे. डॉ. एम. ए. भदाणे हे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून 20 वर्षांपासून कार्यरत आहे. संख्याशास्त्र हा विषय सोप्या पद्धतीने शिकविण्याकरिता ते विद्यार्थीप्रिय आहेत. त्यांचे अनेक संशोधन लेख विविध research journals मध्ये प्रकाशित झालेले आहेत. तसेच विद्यापीठाच्या विविध समित्यांवर आणि प्रशासकीय कामांमध्ये त्यांनी योगदान दिलेले आहे.
 शैक्षणिक संख्याशास्त्र हे पुस्तक अत्यंत सोप्या पद्धतीने लिहिलेले असल्याने संख्याशास्त्र हा विषय नव्याने अभ्यासणाऱ्या विध्यार्थ्याला देखील विषय सोपा वाटतो व त्यामुळे संख्याशास्त्रातील अवघड संकल्पनांचे आकलन लवकर होते. संख्याशास्त्रातील जवळपास सर्वच संकल्पनांवर व पद्धतींवर आधारित प्रकरणे या पुस्तकात आहेत. प्रत्येक पद्धतीचे उदाहरणे नमुन्यादाखल सोडवून दाखविलेली आहेत. प्रत्येक संख्याशास्त्रीय पद्धत कोठे व कशी वापरतात, त्या पद्धतीचे गुण-दोष असे सविस्तर विवेचन केलेले आहे. तसेच संख्याशास्त्राच्या अभ्यासाकरिता व विश्लेशनाकरिता आवश्यक तक्त्यांचाही समावेश पुस्तकात केलेला आहे. विशेष म्हणजे विविध सामाजिक शास्त्रांमध्ये संशोधन करणाऱ्या संशोधकांनाही संख्याशास्त्रीय विश्लेशनाकरिता हे पुस्तक उपयुक्त व मार्गदर्शक असा संदर्भग्रंथ ठरते.
सवलतीच्या दारात पुस्तक प्राप्त करण्यासाठी संपर्क
9850225604 / 9923598713 / 0253-2394718